रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनारी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींचे वाळूशिल्प
रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : भारतरत्न, दिवंगत पंतप्रधान, भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भाट्ये येथे भाजपाच्या वतीने कलाकार अमित पेडणेकर यांनी वाजपेयींचे वाळूशिल्प आज साकारले. या वाळूशिल्पाचे अनावरण आमदा
अटलबिहारी वाजपेयी यांचे वाळूशिल्प


रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : भारतरत्न, दिवंगत पंतप्रधान, भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भाट्ये येथे भाजपाच्या वतीने कलाकार अमित पेडणेकर यांनी वाजपेयींचे वाळूशिल्प आज साकारले.

या वाळूशिल्पाचे अनावरण आमदार, भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी केले. भाट्ये गावात सुमारे तीन हजार जणांनी आज वाळूशिल्प पाहिले. पर्यटक, रत्नागिरीकर आणि लग्न, साखरपुडा आदी मंगल सोहळ्यानिमित्त आलेल्या पाहुण्यांनी भाट्ये किनाऱ्यावर हे वाळूशिल्प पाहून भाजपच्या उपक्रमाचे कौतुक केले.

अमित पेडणेकर यांनी सुमारे १० तास मेहनत घेऊन हे वाळूशिल्प साकारले. अटलबिहारी वाजपेयी यांचा चेहरा साकारताना भरपूर मेहनत घ्यावी लागली, असे त्यांनी सांगितले. त्याशेजारी भाजपचा रंगीत ध्वजही साकारण्यात आला. कलाकार अमित पेडणेकर यांचा सत्कार रवींद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ केला. कलाकार पेडणेकर यांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले. यापूर्वी त्यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ कीर यांचे वाळूशिल्प साकारले होते. मूर्तीकार असणारे पेडणेकर हे उत्तम कलाकार आहेत.

या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, मंदार खंडकर, प्रदेश महिला सचिव शिल्पा मराठे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विक्रम जैन, प्रशांत डिंगणकर, पल्लवी पाटील, संतोष आंबेरकर, अशोक वाडेकर, दादा दळी, विवेक सुर्वे, डॉ. चंद्रशेखर निमकर, दादा ढेकणे, विजय निकम, प्रतिक देसाई, संकेत कदम, संजय यादव, सुशांत पाटकर, नीलेश आखाडे, बावा नाचणकर, राजू भाटलेकर, संपदा तळेकर, सुप्रिया रसाळ, संजय पाथरे, राकेश भाटकर, धनंजय मराठे, सिद्धाय मयेकर, चिन्मय शेट्ये, संदीप सुर्वे, प्रणाली रायकर यांच्यासमवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande