रत्नागिरी : गव्हे येथे ६१ ग्रामस्थांची नेत्रतपासणी
रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : गव्हे (ता. दापोली) येथे राष्ट्रीय सेवा योजना, हरितसेना कृषी महाविद्यालय (दापोली), घरडा हॉस्पिटल (लोटे) तसेच गव्हे, निगडे ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर झाले. त्यावेळी ६१ ग्रामस्थांची नेत्रतपा
रत्नागिरी : गव्हे येथे ६१ ग्रामस्थांची नेत्रतपासणी


रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : गव्हे (ता. दापोली) येथे राष्ट्रीय सेवा योजना, हरितसेना कृषी महाविद्यालय (दापोली), घरडा हॉस्पिटल (लोटे) तसेच गव्हे, निगडे ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर झाले. त्यावेळी ६१ ग्रामस्थांची नेत्रतपासणी करण्यात आली. सरपंच लक्ष्मण गुरव यांचा शिबिरात महत्त्वाचा सहभाग होता.या वेळी सहयोगी अधिष्ठाचा डॉ. मकरंद जोशी, डॉ. विवेक वाजे, डॉ. अविनाश कापुरे, डॉ. अशोक घाडगे, पूनम पवार, जनसंपर्क अधिकारी विवेक बनकर, बाळकृष्ण जोशी, पोलिस पाटील, अरुण पालटे, सुधाकर मोरे, माजी सरपंच वसंत घरखे, डॉ. संतोष वरखेडकर, डॉ. आशीष शिगवण, सुनंदन भावे आदी उपस्थित होते.

शिबिराचा १४६ ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यामध्ये ६१ ग्रामस्थांची नेत्रतपासणी करण्यात आली, तर आठ व्यक्तींचे मोतीबिंदूचे निदान झाले आहे. त्यांच्यावर लोटे येथील घरडा रुग्णालयात अल्पदरात शस्त्रक्रिया होणार आहे. २३ जणांची ईसीजी चाचणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार औषधे, गोळ्या, सिरप यांचेही वाटप करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande