काबुल , 25 डिसेंबर (हिं.स.)। नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटनांमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. यातच आता पाकिस्ताननेअफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला केल्याचे माहिती समोर आली आहे.माध्यमातील माहितीनुसार, मंगळवारी रात्री हा हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही असल्याचे सांगण्यात येत आहे.
अफगाणिस्तानात लपून बसलेल्या पाकिस्तानी तेहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानने हा हवाई हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात लामनसह एकूण सात गावांना टार्गेट करण्यात आले होते. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यात अफगाणिस्तानात मोठे नुकसान झाले आहे.या हवाई हल्ल्यांत अफगाणिस्तानातील पाकिस्तानी तालिबानच्या अनेक संशयित ठिकाणांना निशाना बनवण्यात आले. त्यांचे एक ट्रेनिंग सेंटरही नष्ट करण्यात आले आहे. तसेच बंडखोरांनाही मारण्यात आले आहे. या बॉम्बिंगसाठी पाकिस्तानी जेटचा वापर करण्यात आला. आम्ही पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पक्तिका प्रांतातील काही भागांत हे हल्ले केले असल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले. भविष्यात या परिसरात आणखी तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मार्च महिन्यापासून पाकिस्तानी तालिबानच्या कथित तळांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 15 जण ठार झाल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही अनेक भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने चोख प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. अफगाणिस्तानला आपली जमीन आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे तालिबानने एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानी लढाऊ विमानांनी बॉम्बफेक केलेल्या भागात वझिरीस्तानच्या निर्वासितांचाही समावेश होता, असंही तालिबान संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash