अभाविपचे उद्यापासून सावंतवाडीत कोकण प्रांत अधिवेशन 
सिंधुदुर्ग, 26 डिसेंबर (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत अधिवेशन २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत अहिल्याबाई होळकर नगर, भोसले नॉलेज सीटी सावंतवाडी येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनाला एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजका
अभाविपचे उद्यापासून सावंतवाडीत कोकण प्रांत अधिवेशन 


सिंधुदुर्ग, 26 डिसेंबर (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत अधिवेशन २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत अहिल्याबाई होळकर नगर, भोसले नॉलेज सीटी सावंतवाडी येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनाला एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते मागील 2 महिन्यापासून अधिवेशनाच्या तयारीसाठी झटत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मान्यवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. हे अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अविस्मरणीय अधिवेशन ठरेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत समिती सचिव, अतुल काळसेकर यांनी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत अधिवेशन २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत अहिल्याबाई होळकर नगर, भोसले नॉलेज सीटी सावंतवाडी येथे संपन्न होत आहेत.

कार्यक्रमाची माहिती देताना कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की, आज २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि संमेलनाच्या स्वागत समितीचे उपाध्यक्ष शरद गांगल यांचे हस्ते करण्यात आले. विद्यार्थी परिषदेच्या ७५ वर्षांच्या कारकीर्दीचा मागोवा या प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे, कला, लोकजीवन आणि विविध वस्तु यांचा सुद्धा या प्रदर्शनी मध्ये समावेश आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज सभागृहामध्ये २७ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता करण्यात येणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी यांचे हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे असणार आहेत.

या अधिवेशनामध्ये अभाविप : परिवर्तनकारी छात्र आंदोलन, आनंदमय सार्थक छात्र जीवन, विकसित कोकण आणि समृदध कोकण ही भाषण सत्रे होणार आहेत.

२८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी राजवाडा येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा शहरामध्ये प्रमुख रस्त्यांवरून जात गांधी चौक येथे पोचल्यावर तेथे सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेमध्ये प्रमुख वक्ता अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री कु. शिवांगी खरवाल, दिल्ली ह्या मार्गदर्शन करणार आहेत.

या अधिवेशनामध्ये तीन परिसंवाद होणार असून त्यामध्ये २७ डिसेंबर रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा.मनिष जोशी यांच्या उपस्थितीत 'नवीन शैक्षणिक धोरण' या विषयावर होणार आहे. २८ डिसेंबर रोजी कोकण सागरी सीमा सुरक्षा या परिसंवादामध्ये अनिकेत कोंडाजी, रविकिरण तोरसकर, ह्यांच्या सह या विषयात अभ्यास असणारे तज्ञ उपस्थित रहाणार आहेत. तसेच 'समृद्ध कोकण – विकसित कोकण' या विषयावर दुसरा परिसंवाद होईल. यामध्ये प्रा. मंदार भानुशे, गुरु राणे, श्रीकृष्ण परब, सुनिल उकीडवे, मनिष दळवी असे तज्ञ व्यक्ती या परिसंवादात सहभागी होणार आहेत. या परिसंवादात व्यापार उद्योग आवश्यक सुविधा, शेती, बांबु / फळ प्रक्रिया, बँकिंग व नविन तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

२९ रोजी अभाविप पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन होणार आहे. या संमेलनाला माजी मंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, अभाविपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री देवदत्त जोशी हे उपस्थित राहणार आहेत.

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande