मुंबई, 27 डिसेंबर (हिं.स.)।
मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (३१.१२.२०२४ / १.१.२०२५ च्या मध्यरात्री) प्रवाशांकरीता खालीलप्रमाणे विशेष उपनगरीय सेवा चालविणार आहे.
मुख्य लाइन
विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२४ / १.१.२०२५ च्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२४ / १.१.२०२५ च्या मध्यरात्री कल्याण येथून ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन
विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२४ / १.१.२०२५ च्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि ०२.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२४ / १.१.२०२५ च्या मध्यरात्री पनवेल येथून ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.५० वाजता पोहोचेल.
या सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील.
प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी याची नोंद घ्यावी, या सेवांचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित प्रवास करावा.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने