राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजीटल प्लॅटफार्मवर नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर, 27 डिसेंबर (हिं.स.)।मस्त्य व्यवसाय विभागातंर्गत येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्था यांनी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजीटल प्लॅटफॉर्म (एन.एफ.डी.पी.) पोर्टलवर नोदंणी करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व
राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजीटल प्लॅटफार्मवर नोंदणी करण्याचे आवाहन


लातूर, 27 डिसेंबर (हिं.स.)।मस्त्य व्यवसाय विभागातंर्गत येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्था यांनी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजीटल प्लॅटफॉर्म (एन.एफ.डी.पी.) पोर्टलवर नोदंणी करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त तेजस्विनी सिंधु प्रदीप करळे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य विक्रेते तसेच सर्व मच्छिमार सहाकरी संस्थांचे सभासद, मत्स्य उत्पादक शेतकरी संघ मत्स्यव्यवसाय विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजीटल प्लॅटफॉर्म (एन.एफ.डी.पी.) पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. ही नोंदणी https://nfdp.dof.gov.in, https://pmmkssy.dof.gov.in या लिंकवर स्वत: किंवा नजीकच्या सीएससी केंद्रात अधारकार्ड, बँक पासबुक यासह जावून विनामुल्य करता येईल. तसेच ई-श्रम कार्डसाठीची नोंदणी hpps://eshram.gov.in या लिंकवर करावी. अपघात गटविमा नोंदणीबाबतची 31 कॉलमची माहिती तसेच के.सी.सी.बाबतची माहिती या कार्यालयास सादर करावी, असे करळे यांनी कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande