केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी - खा. सुनिल तटकरे
रायगड, 27 डिसेंबर (हिं.स.)। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना असून या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश खासदार सुनिल तटकरे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित विविध शासकीय विभा
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी - खा. सुनिल तटकरे


रायगड, 27 डिसेंबर (हिं.स.)।

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना असून या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश खासदार सुनिल तटकरे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित विविध शासकीय विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी खा. सुनिल तटकरे म्हणाले की, जिल्ह्यात असलेल्या दिव्यांग, अपंग व्यक्तींना त्यांची तपासणी करुन आवश्यक असलेले साहित्य, उपकरणे यांचा पुरवठा करण्यात यावा. तसेच वयोश्री योजनेंतर्गत जिल्ह्यातील 65 वयोमर्यादेवरील ज्येष्ठ नागकांसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करुन त्यांची योग्य ती तपासणी करावी. शहरी भागातील नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय तर ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शिबिरांचे आयोजन करावे. वयोश्री योजनेंतर्गत शिबिरांचे कामकाज 15 ते 20 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या. तसेच केंद्र शासनाच्या असलेल्या वयोश्री योजनेमधून तपासणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य, उपकरणे देण्यात असावी. तर राज्य शासनाच्या असलेल्या वयोश्री योजनेमधून तपासणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना रु.3 हजार देण्यात यावे. तालुका निहाय शिबिरांचे आयोजन करताना तेथील लोकप्रतिनिधींनाही कळविण्यात यावे. केंद्र व राज्य शासनाच्या वयोश्री योजनेकरिता आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धतता करुन दिली जाईल. शिबिरांमध्ये तपासणी केलेल्या नागरिकांची योग्य रितीने तपासणी करुन त्या प्रत्येकांची नोंद जतन करुन ठेवावी.

जिल्ह्यातील बँकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांकरिता दिलेले उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करावे. तसेच शेतकऱ्यांना खरीब व रब्बी पिकांसाठी आवश्यक असलेल्या कर्ज प्रकरणांची कार्यवाही तातडीने करुन शेतकऱ्यांना कर्ज विहित वेळेत कसे मिळेल ते पाहावे. ज्या बँकांचे पिक कर्ज वाटपाचेप्रमाण कमी आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande