जिल्हा सुशासन निर्देशांकात अमरावती जिल्ह्याचा चौथा क्रमांक
अमरावती27 डिसेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला जिल्हा सुशासन निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यापैकी अमरावती जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागलेला आहे. सन 2023 मध्ये अमरावती जिल्ह्याचा सुशासन निर्देशांकाचे गुणानुक्रमांक 15 अ
जिल्हा सुशासन निर्देशांकात अमरावती जिल्ह्याचा चौथा क्रमांक


अमरावती27 डिसेंबर (हिं.स.)

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला जिल्हा सुशासन निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यापैकी अमरावती जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागलेला आहे. सन 2023 मध्ये अमरावती जिल्ह्याचा सुशासन निर्देशांकाचे गुणानुक्रमांक 15 असा होता. त्या अनुषंगाने निर्देशांकाच्या वाढीबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व विभागांशी सांगड घालून क्षेत्रनिहाय बैठका घेण्यात आल्या. त्याचे नियोजन करुन त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या.

महाराष्ट्र शासनाचा जिल्हा सुशासन निर्देशांक (डिजीजीआय) हा केंद्र शासनाचे सुशासन निर्देशांक (जीजीआय) च्या धर्तीवर विकसित करण्यात आलेला आहे. या निर्देशांकामध्ये जिल्ह्यातील प्रशासकीय, कृषी, आर्थिक, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, विधी व न्याय व इतर आवश्यक निकषांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या निर्देशांकामध्ये जिल्ह्यातील सुशासनाचे स्थितीचे मुल्यांकन करुन तुलनात्मक चित्र उपलब्ध करुन देणारे सर्व समावेशक व अंमलबजावणी करणे योग्य असे साधन आहे. या अंतर्गत कृषी आणि संलग्न क्षेत्र यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत गुणानुक्रमांक 15 वरुन थेट प्रथम क्रमांकावर तसेच नागरिक केंद्रित प्रशासन या क्षेत्रात गुणानुक्रमांक 20 वरुन 5 व्या क्रमांकावर झेप घेण्यात आली तसेच सामाजिक विकास या क्षेत्रात गुणानुक्रमांक दुसरा गाठण्यात आला. सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि उपयुक्तता, पर्यावरण, वाणिज्य आणि उद्योग तसेच मनुष्यबळ विकास इत्यादी क्षेत्रांतील कामगिरीमध्ये जिल्ह्याची सुधारणा झालेली आहे. यासाठी प्रशासनातील विभागांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच मागे राहिलेल्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करणेबाबत संबंधितांना जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी सूचना दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande