जळगाव : घटस्फोटीत महिलेची चिमुकलीसह आत्महत्या
जळगाव, 27 डिसेंबर (हिं.स.) घराच्या तिसऱ्या मजल्यावरील छताच्या कळीला दोराने गळफास घेऊन सपना प्रकाश माळी (वय ३३) या घटस्फोटीत महिलेने चिमुकली केतकी सपना माळी (वय ९) या दोघींनी आत्महत्या केल्याची घटना महादेव मंदिर परिसरात उघडकीस आली. या घटनेबाबत एरंडोल
जळगाव : घटस्फोटीत महिलेची चिमुकलीसह आत्महत्या


जळगाव, 27 डिसेंबर (हिं.स.) घराच्या तिसऱ्या मजल्यावरील छताच्या कळीला दोराने गळफास घेऊन सपना प्रकाश माळी (वय ३३) या घटस्फोटीत महिलेने चिमुकली केतकी सपना माळी (वय ९) या दोघींनी आत्महत्या केल्याची घटना महादेव मंदिर परिसरात उघडकीस आली. या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विशेष हे की घटनास्थळी गादीवर वही मिळून आली असून त्यात सपना माळी हिच्या हस्ताक्षरात लिहिलेले असून तिने आपल्या नातेवाईकांचे नावाने लिखाण केलेले असून त्यामध्ये आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केलेला आहे. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे.

एरंडोल येथे जहांगीरपुरा भागातील महादेव मंदिर परिसरात सपना माळी ही माहेरी राहत होती. तिचा घटस्फोट जवळपास आठ वर्षांपूर्वी झालेला होता. तिसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. मृत महिलेचा भाऊ राहुल माळी याने एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यानुसार राहुल हा घरी गेला असता त्याला त्याची बहीण सपना व भाची केतकी हे घरी दिसले नाहीत म्हणून त्याने तिसऱ्या मजल्यावर जाऊन बघितले असता खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता त्याने बहिणीला आवाज दिला असता काही एक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर तो व त्याचा चुलत भाऊ मोहन महाजन यास फोन द्वारे सदर घटना सांगितली असता. खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा उघडला नाही. सुताराला बोलवुन दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडला असता सपना व केतकी या दोघी छताच्या वेगवेगळ्या कळीला दोराने गडफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आल्या. त्यावेळी राहुलने एकच हंबर्डा फोडला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले, हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande