सोलापूर : दुचाकी चोरी अन्‌ एलईडी चोर जेरबंद
सोलापूर, 28 डिसेंबर (हिं.स.) : शहर हद्दीतून दुचाकी, रोकड, एलईडी टीव्ही चोरणाऱ्या विविध पाच गुन्ह्यातील सहा संशयित चोरट्यांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण दोन दुचाकी, सात एलईडी व रोकड, असा एकूण तीन
सोलापूर : दुचाकी चोरी अन्‌ एलईडी चोर जेरबंद


सोलापूर, 28 डिसेंबर (हिं.स.) : शहर हद्दीतून दुचाकी, रोकड, एलईडी टीव्ही चोरणाऱ्या विविध पाच गुन्ह्यातील सहा संशयित चोरट्यांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण दोन दुचाकी, सात एलईडी व रोकड, असा एकूण तीन लाख ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रेल्वे स्थानकासमोरून एका व्यक्तीच्या हातातील बॅग हिसकावून पळून गेलेला संशयित चोरटा प्रदिप अशोक गुरव (वय ३६, रा. रेवणसिद्धेश्वर मठाशेजारी, जुना विजापूर नाका झोपडपट्टी) याला पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने कंबर तलाव ते जगदीश मंगल कार्यालयाच्या रोडवरून ताब्यात घेतले.त्याच्याकडून ४२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याकडे दहा वर्षांपूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरातून चोरलेली दुचाकीही सापडली. याच पथकाने तानाबाना चौक ते वल्याळ बाग या रोडवरून जाणाऱ्या उदयकुमार रामलू कामुर्ती व आनंद श्रीरामलू नक्का यांना थांबविले.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande