नाशिक : गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक पाच हजाराची लाच घेताना अटक
नाशिक, 28 डिसेंबर (हिं.स.) भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा सहायक पोलिस उपनिरीक्षक याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. राजेंद्र सोपान घुमरे वय 56 वर्षे, व्यवसाय-नोकरी (सहा. पोलीस उपनिरीक
arrest logo


नाशिक, 28 डिसेंबर (हिं.स.) भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा सहायक पोलिस उपनिरीक्षक याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. राजेंद्र सोपान घुमरे वय 56 वर्षे, व्यवसाय-नोकरी (सहा. पोलीस उपनिरीक्षक, वर्ग-3, गुन्हे शाखा, युनिट 2, नाशिक शहर नाशिक , रा. प्लॅट नं. 4, राधा शिल्प अपार्टमेंट, गणेशनगर, द्वारका नाशिक असे या लाचखोर पोलिसांचे नाव आहे. यातील तक्रारदार हे भंगार व्यापार करीत असुन तक्रारदार यांच्या भावाने चोरीचे नळाचे वॉल भंगारात 15 हजार रुपये खरेदी केल्याचे प्रकरणी चोरीच्या गुन्हयातून सुटायचे असेल तर आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार मागणी करून त्यांचे सोबतच्या पोलिसांना कारवाई न करण्यासाठी सांगण्याकरिता व चोरीचा वॉल घेतल्याचे प्रकरण मिटवून टाकण्यासाठी फिर्यादीकडे तडजोडी अंती 5000/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुध्द अंबड पोलीस स्टेशन, नाशिक शहर, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande