जळगाव, 27 डिसेंबर (हिं.स.)भडगाव तालुक्यातील सावदे शिवारातील वडिलोपार्जित शेत जमीन आहे. सदर जमीन वरून तकारदार यांचे बहिणीचे हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी व 7/12 उत्तारे देण्याच्या मोबदल्यात पिंप्रीहाट तलाठी व पंटर यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम 4 हजार, लाचेची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करताच जळगाव लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले. म्हणून भडगाव पोलीस स्टेशन येथे तलाठी व पंटर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी याची भडगाव तालुक्यात सावदे शिवारात गट नं. 35 व 37/2 अशी वडीलोपार्जीत शेत जमीन आहे. सदर शेत जमीनीवरुन फिर्यादी यांना त्यांची बहीण योगीता सुनिल पाखले रा. फुलबी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर हिचे हक्कसोड पत्राची नोंद घेऊन तसे 7/12 उतारे पाहीजे होते. त्याबाबत फिर्यादी यांनी पिंप्रीहाट गावाचे सरपंच दिपक मोरे यांचेसह पिप्रीहाट कनाशी कार्यालयात जाऊन आलोसे क्र. 1 यांची भेट घेतली असता सदरचे काम करुन देण्याचे मोहबदल्यात त्यांनी फिर्यादीकडे चार हजार रुपये लाच रकमेची मागणी केली त्याबाबत फिर्यादी यांनी ला.प्र.वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहुन दिली होती. सदर लाच मागणी तक्रारीची दि. 04/12/2024 व दि. 06/12/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आलोसे क्र. 1 यांनी भडगांव तालुक्यातील सावदे शिवारातील गट नं. 35 व 37/2 या फिर्यादी यांचे वडीलोपार्जीत शेत जमीनीवरुन त्यांची बहीण सौ. योगीता सुनिल पाखले रा. फुलब्नी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर हिचे हक्कसोड पत्राची नोंद घेऊन तसे 7/12 उतारे देण्याचे मोहबदल्यात फिर्यादीकडे स्वतासाठी प्रथम चार हजार रुपेय व तडजोडी अंती तीन हजार रुपये लाच रकमेची मागणी केली.
त्यांच्या सोबत काम करणारा धिरज पुर्ण नाव पत्ता माहीत नसलेल्या इसमाने तलाठी विलास बाबुराव शेळके यांचे लाच मागणीचे समर्थन करुन फिर्यादीस त्यांना दोन हजार रुपये प्रमाणे लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून भडगाव पोलिस स्टेशन ला गु. र. न 468/2024 कलम भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 कलम 7 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा जळगांव येथील लाच लुचपत विभागाचे दिनेशसिंग पाटील म.पो.हे.कॉ. शैला धनगर पो कॉ राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आदी पथकात होते.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर