ठाणे, 27 डिसेंबर (हिं.स.)। अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे विभागातील शासकीय / अनुदानित आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा सन 2024-25 शुक्रवार, दि.27 डिसेंबर 2024 ते रविवार, दि.29 डिसेंबर 2024 या कालावधीत एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल, शेंडेगाव (भातसानगर), ता.शहापूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन दि.27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता संपन्न होणार असून उद्घाटक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असतील तर प्रमुख अतिथी म्हणून वनमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित हे असतील.
स्पर्धेचा बक्षिस वितरण व समारोप समारंभ रविवार, दि.29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक आयुक्त श्रीमती नयना गुंडे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (भा.प्र.से.), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.), ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव (भा.प्र.से.) हे असणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर