कॅनबेरा , 27 डिसेंबर (हिं.स.)।बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील महत्त्वाचा सामना भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. मेलबर्नच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात विराट कोहली आपल्या फलंदाजीमुळे नव्हे, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.या सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट जेव्हा बाद होऊन मैदानाबाहेर जात होता, त्यावेळी विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन फॅन्स यांच्यात बाचाबाची झाली, ज्याचा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मेलबर्न कसोटीतील पहिल्या डावात विराटने चांगली सुरुवात केली होती. मात्र ऑफ स्टंप बाहेरचा बॉल मारण्याच्या नादात तो ३६ धावांवर आऊट झाला. दरम्यान बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये जात असताना, ऑस्ट्रेलियन फॅन्सने त्याची जोरदार खिल्ली उडवली. त्यांनतर विराट आत गेलाच होता, इतक्यात काही जणांनी तर अश्लिल टीका टीप्पण्या सुद्धा केल्या.त्यामुळे विराट भडकला आणि लगेच बाहेर आला.बाहेर येताच विराटने त्या फॅनला उत्तर दिलं.आणि वाद पेटला. शेवटी सुरक्षारक्षकांनी विराटला समजावून पुन्हा ड्रेसिंग रूमच्या दिशेनं जाण्याची विनंती केली. मग विराट आत गेला.दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या सामन्यातील पहिल्या दिवसापासून विराट कोहली जोरदार चर्चेत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सॅम कॉन्टासला पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत सॅम कॉन्टासनं शानदार अर्धशतकी खेळी केली.या खेळा दरम्यान विराटने सॅम कॉन्टासला धक्का दिला. आणि ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यांनतर विराटवर जोरदार टीका केली जात होती. त्यानंतर आयसीसीने विराटवर कारवाई करत, त्याच्या मॅच फीवर २० टक्के दंड आकारला आणि १ डिमेरीट पॉईंटही दिला. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन फॅन्स विराटच्या विरोधात नारे देताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे भारतीय फॅन्स विराटला समर्थन करताना दिसून येत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash