कॅनबेरा , 27 डिसेंबर (हिं.स.)।भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करत भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे.ऑस्ट्रेलियाने 474 धावांची मोठी धावसंख्या उभारली. तर भारतीय संघाने पहिल्या डावात 5 विकेट गमावून 164 धावा केल्या आहेत.भारतीय संघ आता देखील ऑस्ट्रेलियाशी 310 धावांनी मागे आहे. तर भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 111 धावांची गरज आहे.
पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ करत पहिल्या दिवसाच्या 311/6 धावसंख्येपासून संघाने 140 हून अधिक धावा जोडल्या. आतापर्यंत पहिल्या सत्रात फक्त एक विकेट पडली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित तीन विकेट दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच पडल्या. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक स्टीव्ह स्मिथने 140 धावा केल्या, तर सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅबुशेन यांनी अर्धशतकी खेळी खेळल्या. परिणामी संघाने एक मोठी धावसंख्या (474) उभारली. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या.
तर दुसरीकडे या सामन्यात भारतीय कर्णधार सलामीवीर म्हणून आला आणि अपयशी ठरला. त्याला 3 धावा करता आल्या. या मालिकेत रोहित आतापर्यंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. तर यशस्वी जैस्वालने दमदार अर्धशतक पूर्ण केले, मात्र तो धावबाद झाला आणि त्यानंतर विरोट कोहली देखील बाद झाला. भारताची दिवसातील शेवटची विकेट आकाश दीपच्या रूपाने पडली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताची धावसंख्या 164 /5 अशी आहे.त्यामुळे भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 111 धावांची गरज आहे. आत फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडिया कशी खेळी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash