अमरावती 28 डिसेंबर (हिं.स.)
नेरपिंगलाई गावात दर गुरवार आठवडी बाजारात हजारोंचे मोबाईल लंपास होत असल्याने सामान्य नागरिक चांगलाच त्रस्त झालेला आहे.विशेष म्हणजे एक महिन्याच्या अंतराणी हे चोरटे आपलले काम फत्ते करतात.
नेरपिंगलाई गाव आजु बाजूच्या खेड्यांची बाजारपेठ असल्याने गावामध्ये दर आठवड्यात गुरवारी भाजीबाजार भरतो.या बाजारात अनेक आजू बाजूच्या खेड्या मधुन मोठ्या प्रमाणात नागरीक गावामद्ये जीवन उपयोगी वस्तू भाजीपाला खरेदी करण्या करीता गावात येतात बाजारा मध्ये भरपूर प्रमाणात गर्दी राहत असल्याने गर्दीचा फायदा घेत चोरटे ग्राहकांच्या मोबाईल वर डल्ला मारत हजारो रुपयाचे वेग वेगळ्या कंपनीचे मोबाईल लंपास करतात.
गेल्या अनेक दिवसापासून मोबाईल चोरी गावात सतत सुर असुन कधी ऐक आठवड्या नंतर तर कधी महिन्या नंतर अनेक नागरिकांचे मोबाईल चोरी जात असुन 26 ला सुद्धा गुरुवारी अनेक नागरिकांचे महागड्या किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. अनेक दिवसापासुन गावात चोरीचे सत्र सूरू असल्याने हे चोरटे नागरिकांच्या घरा कडे मोर्चा तर वळवणार नाही ना? अशी चर्चा आता गावात ऐकायला मिळत असल्याने नागरिकातमद्ये भीती चे वातावण निर्माण झाले पोलिस नेमकी काय भूमिका घेणार की हे सत्र असेच सूरुच राहील या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी