'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनात महिलांच्या स्टॉलद्वारे तब्बल १५ कोटींची उलाढाल
मुंबई, ३१ डिसेंबर (हिं.स.) : खेड्यागावातील महिलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी 'उमेद अभियान' आयोजित 'महालक्ष्मी सरस' या प्रदर्शनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सिडको एक्झिबिशन वाशी, नवी मुंबई येथे नुकतंच'महालक्ष्मी सरस' हे प्रदर्शन आयोजित करण्य
महालक्ष्मी सरस


महालक्ष्मी सरस


मुंबई, ३१ डिसेंबर (हिं.स.) : खेड्यागावातील महिलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी 'उमेद अभियान' आयोजित 'महालक्ष्मी सरस' या प्रदर्शनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सिडको एक्झिबिशन वाशी, नवी मुंबई येथे नुकतंच'महालक्ष्मी सरस' हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात जवळपास १००० हून अधिक महिला सहभागी होत त्यांनी विविध स्टॉल्स लावले होते. ज्यामध्ये हातमागाच्या वस्तू, घरगुती उत्पादने आणि खाद्यपदार्थ या व अश्या अनेक स्टॉल्सचा समावेश होता. मुख्यतः या प्रदर्शनात तामिळनाडू, आसाम आणि गुजरात यांसारख्या राज्यांमधील आणि ३४ जिल्ह्यांतील ग्रामीण महिला सहभागी झाल्या होत्या. प्रदर्शनादरम्यान महिलांच्या स्टॉलद्वारे तब्बल १५ कोटी रुपयांची विक्री झाली. 'महालक्ष्मी सरस' या प्रदर्शनामुळे महिलांच्या आयुष्यात साकारत्मकता वाढली असं म्हणता येईल कारण त्यांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

आता खऱ्याअर्थाने 'उमेद अभियान'मुळे सामान्य महिला उद्योजिका बनू शकतील. 'महालक्ष्मी सरस' हे प्रदर्शन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले जाते. 'उमेद अभियान' सामान्य महिलांना आर्थिक सहाय्य आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रशिक्षण देखील प्रदान करते. याशिवाय, 'उमेद अभियान'ने 'उमेद मार्ट' नावाचे एक ऑनलाइन व्यासपीठ देखील उपलब्ध करून दिले आहे, जिथे या महिलांचे घरगुती उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामुळे महिलांना त्यांचं प्रोडक्ट विकणं अगदी सोपं झालं आहे. 'उमेद मार्ट' मध्ये सर्व घरगुती पदार्थ उपलब्ध आहेत. विविध भागातील महिला या मार्ट द्वारे त्यांचा व्यवसाय पुढे घेऊन जात आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे मुख्य अधिकारी रुचेश जयवंशी 'महालक्ष्मी सरस' या प्रदर्शनाबद्दल म्हणाले की, नुकतंच वाशी येथे 'महालक्ष्मी सरस' हे प्रदर्शन 'उमेद अभियान'मार्फत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधील १००० हून अधिक महिलांच्या घरगुती उत्पादनाचे स्टॉल समाविष्ट होते. यामध्ये कलाकुसर, लाकडी खेळण्या, मूर्ती बनविणे, खाद्यपदार्थ, आरोग्यदायी शरबत आणि महाराष्ट्रातील सर्व भागांच्या चवीचे, राज्याची खाद्य संस्कृती दर्शविणारे फूड कोर्ट सुद्धा होते. महिलांच्या स्टॉलद्वारे जवळपास १५ कोटींपेक्षा जास्त विक्री झाली. या पुढील प्रदर्शनात ५०० हून अधिक स्टॉल असतील याची खात्री आम्हाला आहे. महिलांचा उद्योग वाढावा यासाठी 'उमेद मार्ट' हे ऑनलाईन व्यासपीठ आम्ही तयार केलं आहे. जिथे महिला घरगुती पदार्थ विकतात. यामुळे त्यांच्या व्यवसायाला गती मिळत आहे. यापुढेही महिलांच्या व्यवसायासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 'उमेद अभियान' प्रयत्न करत राहणार.

उमेद अभियानाने बँकांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांना उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर पतपुरवठा केला जात आहे. या आर्थिक वर्षात सर्व बँकांकडून साधारण ७ हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा महाराष्ट्रात झाला आहे. विविध प्रकारचे प्रशिक्षण उमेद अभियानाकडून महिलांना मिळत असल्यामुळे उत्तम दर्जाचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग करू शकत आहेत. त्यांच्यामधील व्यव्सयिओक्त वाढत आहे. महालक्षमी सरस हि ग्रामीण भागातील कर्तृत्व सिद्ध करू पाहणाऱ्या महिलांसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande