तायक्वॉंदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत संगमेश्वरचे सुयश
रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : संगमेश्वर तालुका तायक्वॉंदो ॲकॅडमी व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स
तायक्वॉंदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत संगमेश्वरचे सुयश


रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : संगमेश्वर तालुका तायक्वॉंदो ॲकॅडमी व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवरूख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात बेल्ट ग्रेडेशन परीक्षा झाली. संगमेश्वर तालुक्याने सुयश मिळविलेल्या या परीक्षेसाठी देवरूख नगरपंचायत तायक्वॉंदो क्लब आणि संगमेश्वर लायन्स तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

यामध्ये यशस्वी खेळाडू असे - यलो- यशराज कटके, पृथ्वीराज कटके, आदित्य चिपळूणकर, ऋतिक कांगने, ग्रीन- नक्षत्रा शिंदे, सोहम नटे, मल्हार साने, अबीर शेट्ये, ग्रीन-वन- वेदांत मसुरकर, पल्लव वनकर, सोहम पवार, ध्रुवा शिंदे, लक्ष्मी मोघे, अजिंक्य शिंदे, श्रेया फाटक, सोहम मालगुंडकर. ब्ल्यू - सोमांश सावंत, शौर्य माळी, रियांश थरवळ, दुर्गा मोघे, पूर्वा वनकर, तनिष्का आनेराव,मंथन चव्हाण. ब्ल्यू-वन- शौर्या वाघमोडे. रेड- अफजान फुलारी, केतकी भुवड. रेड-वन- श्रद्धा देवरूखकर, दुर्वा देवरूखकर, प्रणित कांबळे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande