अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी क्रिकेट स्पर्धेत दुस-या स्थानी
अहमदनगर, 22 मार्च(हिं.स.): संगमनेर तालुक्यातील युवा नेत्या डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ए
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी क्रिकेट स्पर्धेत दुसर्या स्थानी


अहमदनगर, 22 मार्च(हिं.स.): संगमनेर तालुक्यातील युवा नेत्या डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फौंडेशन तर्फे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीच्या टीमने क्रिकेट स्पर्धेत दुसऱा क्रमांक पटकावला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे महिला क्रिकेट व रस्सीखेच या स्पर्धांचे शालेय, महाविद्यालयीन व खुला अशा गटामध्ये आयोजन करण्यात आले होते.सदरच्या शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींनी सांघिक खेळ करताने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande