अमेरिकेत पूल धडकेत जहाजावरील २२ भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित
* तब्बल ४७ वर्षे जुना होता पूल बाल्टिमोर, २७ मार्च (हिं.स.) : अमेरिकेहून श्रीलंकेला माल घेऊन जाणाऱ्य
जहाज 


* तब्बल ४७ वर्षे जुना होता पूल

बाल्टिमोर, २७ मार्च (हिं.स.) : अमेरिकेहून श्रीलंकेला माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर जहाजाची मेरीलँड राज्यातील बाल्टिमोर शहरात तीन किमी लांबीच्या पूलाला धडक बसली. त्यामुळे तब्बल ४७ वर्षे उभा असलेला पूल कोसळला. महत्वाचे म्हणजे या जहाजावर असलेले २२ भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती आहे.

अमेरिकन वेळेनुसार रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. पुलावर आदळल्यानंतर कंटेनर जहाजाने लगेच पेट घेतला. सिंगापूरचा ध्वज असलेले हे जहाज २२ एप्रिलला श्रीलंकेची राजधानी कोलंबोला पोहोचणार होते.

दोन वैमानिकांसह सर्व क्रू मेंबर्सची माहिती घेण्यात आली त्यात कोणीही दुखापतग्रस्त झालेले नाही. तसेच अपघातानंतर कोणतेही प्रदूषण झालेले नाही, असे चार्टर मॅनेजर, सिनर्जी मरीन ग्रुपने सांगितले. सिंगापूर ध्वजांकित हे जहाज नोंदणीकृत ग्रेस ओशन पीटीई लिमिटेड या कंपनीचे आहे. दरम्यान, या जहाजाने फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला जाणूनबुजून लक्ष्य केल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे बाल्टिमोर पोलिसांनी म्हटले आहे.

'फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज'बद्दल

१९७७ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या पुलाचे नाव द स्टार-स्पँगल्ड बॅनरच्या लेखकाच्या नावावरून ठेवण्यात आले होते. फ्रान्सिस स्कॉट की १८१४ मध्ये फोर्ट मॅकहेन्रीवर झालेला बॉम्बस्फोट पाहिल्यानंतर पुलाजवळ बसला होता. असे मानले जाते की ज्यामुळे त्याला अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिण्याची प्रेरणा मिळाली. बाल्टिमोर पोर्टने गेल्या वर्षी सुमारे ८० अब्ज डॉलर किमतीच्या ५२ दशलक्ष टनांहून अधिक आंतरराष्ट्रीय मालवाहतूक केली. मेरीलँड सरकारच्या वेबसाइटनुसार, अमेरिकेतील बंदरांमध्ये बाल्टिमोर पोर्ट नवव्या क्रमांकावर आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande