महात्मा फुले कृषी विद्यापीठात खुल्या गटातील मैदानी स्पर्धेचे आयोजन
अहमदनगर, 12 एप्रिल (हिं.स.):- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ
महात्मा फुले कृषी विद्यापीठात 28 एप्रिल ला खुल्या गटातील मैदानी स्पर्धेचे आयोजन


अहमदनगर, 12 एप्रिल (हिं.स.):- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी क्रीडा भवन येथे २८ एप्रिल रोजी खुल्या गटातील पुरूष व महिलांसाठी ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲथलेटिक्स स्पर्धेत १००, २००, ४००, ८००, १५०० व ५००० मीटर धावणे, लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, ११० व ४०० मीटर हार्डल्स आणि २० कि.मी. चालणे स्पर्धा होणार आहे. १६ वर्षे पूर्ण झाले ल्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.भाला फेक व हातोडा फेकच्या खेळाडूंना आपल्या स्वतःचा भाला व हातोडा बरोबर घेऊन येण्याचे सांगण्यात आले आहे.या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात देणार आहे.पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.राज्यस्तरीय स्पर्धा २३ मे ते २५ मे या कालावधीत नागपूर येथे होणार आहे.त्याचप्रमाणे सह भागी झालेल्या सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.या स्पर्धेतील खेळाडूंना राज्य गुणवत्ता प्रमाणपत्र ५ टक्के नोकरीसाठी व राज्य व जिल्हा सहभाग प्रमाणपत्र लष्कर भरतीसाठी उपयोगी पडणार आहे.या स्पर्धेसाठी दिनेश भालेराव,राहुल काळे,संदीप हारदे,रावसाहेब मोरकर,जगन गवांदे, श्रीरामसेतू आवारी,संदीप घावटे,अजित पवार,संभाजी ढेरे,राघवेंद्र धनलगडे,दिनेश भालेराव,राहुल काळे,संदीप हारदे आदी प्रयत्नशील आहेत.या स्पर्धेत सह भागी होण्यासाठी ऑफलाईन प्रवेश अर्ज स्पर्धेच्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande