नाशकात ४४ व्या महाराष्ट्र राज्य ब्रीज अजिंक्यपद स्पर्धेची सांगता
नाशिक, २८ एप्रिल, (हिं.स.) : ब्रीज असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन यांच्या सहकार्या
नाशकात ४४ व्या महाराष्ट्र राज्य ब्रीज अजिंक्यपद स्पर्धेची सांगता


नाशिक, २८ एप्रिल, (हिं.स.) : ब्रीज असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली नाशिकच्या केन्सिगटन स्पोर्ट्स क्लब चानसी येथे आयोजित सुहास वैद्य स्मृती चषक ४४ व्या महाराष्ट्र राज्य ब्रीज अजिंक्यपद स्पर्धेची आज मोठ्या उत्साहात सांगता झाली.

अत्यंत चुरशीच्या खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत जनक शहा, एन. राजमोहन, जीतू सोलानी आणि अनल शहा यांच्या जेरेजा संघाने सर्वोत्तम खेळ करून टीम चॅम्पियन या प्रकारात विजेतेपद पटकावले. तर, अजित चक्रदेव, सतीश दिवाणजी, विजय देशपांडे आणि रमेश पटोडीया यांचा समावेश असलेल्या ॲब्रोसिया या संघाने चांगले प्रयत्न करून उपविजेतेपद मिळविले. त्याखालोखाल नाशिकचे खेळाडू हेमंत पांडे, राहुल खंबाटे, आणि मुंबईचे अनिरुद्ध संझगिरी, भास्कर पेंडसे यांच्या डेझल्स संघाने तिसरा क्रमांक मिळविला. तर सुनील माचोर संघाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेमध्ये सह्याद्री, प्रॉमिस,अमोनारा, एस. बी. एस. या संघांनीही जोमाने प्रयत्न करून अनुक्रमे पाच ते आठ क्रमांक मिळविले. स्पर्धेनंतर या सांघिक स्पर्धेत विजेत्या पहिल्या आठ संघांना प्रमुख पाहुणे महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे चेअरमन देवेन दोषी, ब्रीज फेडेरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव आनंद सामंत, जे. के. भोसले, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव हेमंत पांडे यांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande