नगर - सेंट जॉन चर्चच्या मैदानावर डॉन बॉस्को फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ
अहमदनगर, 28 एप्रिल (हिं.स.) - भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉन बॉस्
सेंट जॉन चर्च च्या मैदानावर डॉन बॉस्को फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ


अहमदनगर, 28 एप्रिल (हिं.स.) - भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉन बॉस्को कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन रेल्वे पोलीस अधीक्षक तुषार डोशी यांच्या हस्ते झाले.या फुटबॉल स्पर्धेत जिल्ह्या तील फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवला असून,चर्चच्या मैदानात फ्लड लाईटमध्ये स्पर्धेचा थरार रंगत आहे.

पोलीस अधीक्षक डोशी यांनी मैदानात नारळ वाढवून व फुटबॉलला किक मारुन स्पर्धेला प्रारंभे केला.सेंट जॉन्स चर्चचे फादर विश्वास परेरा, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज वाळवेकर,खालिद सय्यद आदीं सह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुषार डोशी यांनी सेंट जॉन्स चर्चच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या फुटबॉल स्पर्धेचे कौतुक केले.तर युवकांनी आरोग्यासाठी मैदानावर येण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.फादर विश्वास परेरा म्हणाले की,सेंट जॉन्स चर्च फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांना घडविण्याचे काम करत आहे.विविध स्पर्धा घेतल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.पाच दिवसीय फुटबॉल स्पर्धा फादर विश्वास परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.स्पर्धेच्या प्रारंभापासूनच विविध संघातील खेळाडूंनी कौशल्यपणाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आहे.खेळाचे सामने पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमी गर्दी करु लागले आहे.पहिल्या दिवशीच या स्पर्धेत युनिटी,शिवाजीयन्स,फायटर बॉईज व लाइट निंग संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विजय संपादन केले.शहरातील महिला रेफ्री प्रियंका आवारे व सोनिया दोसानी या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande