धुळ्यात उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
धुळे,15 एप्रिल (हिं.स.) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र
धुळ्यात उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


धुळे,15 एप्रिल (हिं.स.) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रामार्फत व धुळे शहरातील विविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीष्मकालीन (उन्हाळी) प्रशिक्षण शिबिर 15 ते 30 एप्रिल दरम्यान उन्हाळी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी दिली आहे.

हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सकाळ व सायंकाळ दोन्ही सत्रात होणार असून या शिबिरात क्रिकेट, बॅडमिंटन, लॉन टेनिस टेबल टेनिस कुस्ती, तायक्वांदो ॲथलेटिक, स्केटिंग बास्केटबॉल, खो खो, कबड्डी, हँन्डबॉल ,टेबल टेनिस, तलवारबाजी, रायफल शूटिंग, फुटबॉल, हॉलीबॉल, बॉक्सिंग व इतर खेळाचे प्रशिक्षण व विविध संघटनाचे खेळाडू, प्रशिक्षक यांच्यामार्फत जिल्हा क्रीडा संकुल, धुळे. गरुड मैदान,धुळे, हेल्दी अकॅडमी, ब्लू माईन क्लब अशा विविध प्रशिक्षण केंद्रात खेळाडूंना देण्यात येणार आहे. हे विविध खेळाचे प्रशिक्षण निःशुल्क असून खेळाडूंना त्या खेळाच्या प्रशिक्षक व संघटनेकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागी खेळाडूंना जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शिबिरात खेळाडूंना खेळाचे नियम, तंत्रशुद्ध कौशल्य, फिजिकल, फिटनेस, योगा, आहार आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या शिबिरात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande