पूंछमधून जप्त केलेले 3 आयईडी नष्ट
पूंछ, 17 एप्रिल (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेली 3 स्फोटके (आयईडी)
पूंछमधून जप्त केलेले 3 आयईडी नष्ट


पूंछ, 17 एप्रिल (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेली 3 स्फोटके (आयईडी) सुरक्षा दलांनी जप्त केलीत. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने हे तिन्ही आईडी नष्ट केलेत.

पोलीस, सीआरपीएफ आणि राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त तुकड्यांनी पूंछ जिल्ह्यातील सनई-गुरसाई जंगल परिसरात शोध मोहिमेदरम्यान 5 किलो, 10 किलो आणि 20 किलो वजनाच्या स्टीलच्या कंटेनरमध्ये ठेवलेले आयईडी जप्त करण्यात आले. लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, हे बॉम्ब एका गुहेत लपवून ठेवले होते. संशयास्पद आईडी आढळून येताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने हे तिन्ही आयईडी सुरक्षितपणे नष्ट केलेत. निवडणूक काळात आयईडी नष्ट केल्यामुळे दहशतवाद्यांचे षडयंत्र उधळून लावण्यात आलेय.

सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी रजनीश यादव यांनी सांगितले की, आम्हाला अप्पर सनई येथे दहशतवादी लपून बसल्याची आणि संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाली आणि त्यानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी विशेष मोहीम सुरू केली. सध्या निवडणुकीची वेळ असून दहशतवादी घातपात करून निवडणुका उधळण्याचा प्रयत्न करत आहेत. या कारवाईदरम्यान कोणालाही अटक करण्यात आली नाही. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande