पंतप्रधानांचा शुक्रवारी नागपुरात मुक्काम
नागपूर, 18 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा श्रीगणेशा वर्धा ज
नरेंद्र मोदी, पंतप्रधान


नागपूर, 18 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा श्रीगणेशा वर्धा जिल्ह्यातून करणार आहेत. वर्धा जिल्ह्यातील श्यामजीपंत येथे उद्या, शुक्रवारी 19 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता मोदींची सभा होणार असून या सभेनंतर ते नागपूरला मुक्काम करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 19 एप्रिल रोजी वर्धा येथील सभा आटोपल्यानंतर रात्री ते नागपूर इथल्या राजभवनात मुक्काम करतील. त्यानंतर शनिवारी सकाळी 9 वाजता ते नांदेड येथील सभेकरीता रवाना होणार आहे. वर्धा येथे भाजपचे रामदास तडस उमेदवार आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा मोदी हे नागपूरला मुक्कामी थांबणार आहेत. गेल्या 10 दिवसांत मोदी यांचा हा दुसरा विदर्भ दौरा असेल. त्यांनी सर्वप्रथम चंद्रपूर येथे सभेला संबोधित केले होते. त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात त्यांची सभा झाली. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राजू पारवे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर शनिवारी 20 एप्रिल रोजी मोदींच्या परभणी, नांदेड आणि हिंगोली येथे होणाऱ्या सभांना संबोधित करणार आहे. या मतदारसंघात 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande