गुजरात : अमित शहांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
गांधीनगर, 19 एप्रिल (हिं.स.) : देशात लोकसभा निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू
अमित शहांनी दाखल केला उमेदवारी अर्ज


गांधीनगर, 19 एप्रिल (हिं.स.) : देशात लोकसभा निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि इतर दिग्गज भाजप नेते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित शाह म्हणाले की, गांधीनगर मतदारसंघात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदार आहेत. शिवाय लालकृष्ण अडवाणी, अटल बिजारी वाजपेयी यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मी गेली 30 वर्षे या मतदारसंघातून आमदार आणि खासदार राहिलो आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. 'या निवडणुकीत नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने संपूर्ण नावलौकिक मिळवले आहे. यूपीए सरकारने निर्माण केलेली पोकळी भरण्यासाठी जनतेने आम्हाला 10 वर्षे दिली, आता पुढील 5 वर्षात विकसित भारताचा पाया उभारायचा आहे. मी देशातील मतदारांना आवाहन करतो की, प्रचंड बहुमताने सर्वत्र कमळ फुलवा.' गांधीनगर लोकसभा जागेसाठी आगामी 7 मे रोजी मतदान होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande