मतदार राजा आम्हाला नक्कीच निवडून देईल - सुनील मेंढे
भंडारा, १९ एप्रिल (हिं.स.) - भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपाचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार सुनील
सुनील मेंढे 


भंडारा, १९ एप्रिल (हिं.स.) - भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपाचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी आज सपत्नीक महाराष्ट्र नूतन शाळेत येऊन मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीचा पर्व आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तींनी घरातून निघून आपला मतदानाचा हक्क पूर्ण करावं असा आवाहन त्यांनी या वेळेस केले. उन्हाचे दिवस असल्यामुळे लोकांनी सकाळी लवकर घरातून निघून आपला हक्क पूर्ण करण्याचे आवाहनही केले आहे. मी केलेल्या पाच वर्षाचे काम आणि नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दहा वर्षाच्या कामाची पावती आम्हाला मतदार राजा नक्कीच निवडून देईल. ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळेस माध्यमांशी बोलताना दाखविला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande