पंतप्रधानांचा नागपुरात मुक्काम
नागपूर, 19 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी नागपूरला पोहचले. वर्धा येथील प्रचा
नरेंद्र मोदी 


नागपूर, 19 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी नागपूरला पोहचले. वर्धा येथील प्रचारसभा आटोपल्यानंतर ते नागपुरात डेरेदाखल झाले. विमानतळाहून त्यांनी थेट राजभवन गाठले. परंतप्रधान रात्री नागपुरातच मुक्काम करतील. त्यानंतर शनिवारी ते हिंगोली आणि नांदेडच्या सभेसाठी रवाना होतील.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान मोदी सातत्याने दौरे करत आहेत. याच अनुषंगाने शुक्रवारी वर्ध्यात पंतप्रधानांची निवडणूक सभा होती. पंतप्रधान दिल्लीहून विशेष विमानाने थेट वर्धा येथे पोहोचले, तेथे उपस्थितांना संबोधित केल्यानंतर ते नागपूरला पोहचले. ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या नागपूरशी पंतप्रधानांचे अनोखे नाते आहे. संघाचे प्रचारक असताना ते अनेकदा नागपूरला वास्तव्यास असायचे. भाजपचे संघटन सरचिटणीस असताना देखील ते नागपुरात येत राहिले आणि येथेच राहिले. पण पंतप्रधान झाल्यानंतर अनेकवेळा पंतप्रधान नागपुरात पोहोचले पण मुक्काम केला नाही. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान म्हणून ते पहिल्यांदाच नागपूर मुक्कामी आहेत. गेल्या 10 दिवसांत मोदींचा हा दुसरा विदर्भ दौरा आहे. त्यांनी सर्वप्रथम चंद्रपूर येथे सभेला संबोधित केले होते. त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात त्यांची सभा झाली. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राजू पारवे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर शनिवारी 20 एप्रिल रोजी मोदींच्या परभणी, नांदेड आणि हिंगोली येथे होणाऱ्या सभांना संबोधित करणार आहे. या मतदारसंघात 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande