जगातील सर्वांत कमी उंचीची ज्योती आमगेने केले नागपुरात मतदान
नागपूर, १९ एप्रिल (हिं.स.) : जगातील सर्वांत कमी उंचीची महिला ज्योती आमगेने संपूर्ण परिवारासह नागपुरा
ज्योती आमगे


नागपूर, १९ एप्रिल (हिं.स.) : जगातील सर्वांत कमी उंचीची महिला ज्योती आमगेने संपूर्ण परिवारासह नागपुरात मतदान केले. ज्योती ३० वर्षांची असून 'बिग बॉस 6' आणि अमेरिकन हॉरर टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झाली आहे.

एकेकाळी आपल्या याच उंचीमुळे थट्टेचा विषयी बनलेली ती आज उंचीमुळेच सेलिब्रेटी झाली आहे. २ फूट १ इंच उंचीची (पूर्ण उंची ६२.८ सेंटीमीटर) ज्योती आमगे जगातील सर्वांत लहान महिला आहे. ज्योतीचा जन्म १६ डिसेंबर १९९३ रोजी झाला. ज्योती किशनजी आमगे हिची उंचीमुळे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने देखील नोंद घेतली आहे. ज्योतीचे वडील किशनजी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. मतदानावेळी तिच्यासोबत आई रंजना देखील उपस्थित होत्या. 'अकॉड्रोप्लासिया' या आजारामुळे ज्योतीची उंची खुंटली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande