पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचार
कूचबिहार, 19 एप्रिल (हिं.स.) : देशात लोकसभा निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचार


कूचबिहार, 19 एप्रिल (हिं.स.) : देशात लोकसभा निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. मात्र मतदानाला सुरुवात होताच पश्चि बंगालमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. राज्यातील कूचबिहार लोकसभा मतदारसंघात चंदामारी येथे मतदान केंद्रासमोर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार चंदामारी येथे मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या दगडफेकीमध्ये भाजपाचा एक पोलिंग एजंट हा जखमी झाला आहे. तसेच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते निशित प्रामाणिक यांच्या घराजवळ बॉम्ब सापडला. हा बॉम्ब पोलिसांनी हटवला आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा असून, येथे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भाजपा यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर काँग्रेस आणि डावे पक्ष हे या दोघांनाही आव्हान देतील. राज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 23, भाजपाने 18 तर काँग्रेसने 1 जागा जिंकली होती. यावेळी राज्यातील मतदारांचा कौल कुणाकडे असेल हे आगामी 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande