मुंबई सीमा शुल्क विमानतळ आयुक्तालयाकडून 9 किलोपेक्षा जास्त सोने जप्त
- मूल्य सुमारे 5.71 कोटी रुपये मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) - विमानतळ आयुक्तालय, मुंबई सीमाशुल्क विभाग
gold seized 


- मूल्य सुमारे 5.71 कोटी रुपये

मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) - विमानतळ आयुक्तालय, मुंबई सीमाशुल्क विभाग-III ने 15 ते 18 एप्रिल, 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर, 14 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 9.482 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले ज्याचे मूल्य सुमारे 5.71 कोटी रुपये इतके आहे. हे सोने तस्करांच्या शरीरावर, गुदाशयात, हातातील सामानात आणि त्यांनी परिधान केलेल्या अंतर्वस्त्रांच्या आत विशिष्ट खिशात लपवून ठेवलेले आढळले. या प्रकरणी एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, नैरोबी, अदिस अबाबा आणि पॅरिस येथून मुंबईला आलेल्या परदेशी नागरिकांना अडवण्यात आले आणि त्यांच्याकडील 22 कॅरेट सोन्याचे वितळलेले बार आणि 22कॅरेट सोन्याचे कच्चे दागिने ज्यांचे एकत्रित वजन 1681 ग्रॅम होते, ते अंतर्वस्त्रांमध्ये आणि शरीरावर लपवून ठेवलेले आढळले.

दुबई (04), अबुधाबी (03), जेद्दा (02), बहरीन (01), कुवेत (01) आणि जकार्ता (01) येथून प्रवास करणाऱ्या 12 भारतीय नागरिकांना रोखण्यात आले आणि त्यांच्याकडून गुदाशय, त्यांच्या अंगावर आणि अंतर्वस्त्रांच्या आत लपवून ठेवलेले 6627 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.

अन्य एका प्रकरणात, दोन भारतीय नागरिकांना विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंतर्वस्त्रात लपवून सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण 1174 ग्रॅम पावडर स्वरूपातील सोने जप्त करण्यात आले. या तिघांनाही अटक करण्यात आली. मुंबई सीमा शुल्क विभाग-III ने ही माहिती दिली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande