भरारी पथकाच्या कर्मचा-यांची शहानिशा करा - महावितरण
नागपूर, 23 एप्रिल (हिं.स.) : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी, नागपूर परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत,
संग्रहित


नागपूर, 23 एप्रिल (हिं.स.) : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी, नागपूर परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत, भरारी पथकाद्वारे विज मिटरची नियमितपणे तपासणी करण्यात येते. तपासणी दरम्यान भरारी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी हे महावितरणचेच अधिकारी व कर्मचारी असल्याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या ओळखपत्राची मागणी करून शहानिशा करुन तपासणी दरम्यान या करमाचा-यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरतर्फ़े करण्यात आले आहे.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी, नागपूर परिक्षेत्र कार्यालया अंतर्गत कार्यरत भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत मिटरच्या तपासणी दरम्यान कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास त्यांनी उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), नागपूर परिक्षेत्र कार्यालय, प्रकाश भवन, लिंक रोड, गड्डीगोदाम, सदर, नागपूर तसेच ईमेल [email protected] यावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande