अल्पसंख्याक समाजाने जी ताकद दिली त्यांचा आयुष्यभर मी ऋणी राहिन - सुनिल तटकरे
श्रीवर्धन, 23 एप्रिल (हिं.स.) दिनांक ७ मे रोजी घड्याळ्याच्या चिन्हावर बटन दाबत सेवा करण्याची संधी द
अल्पसंख्याक समाजाने जी ताकद दिली त्यांचा आयुष्यभर मी ऋणी राहिन - सुनिल तटकरे


श्रीवर्धन, 23 एप्रिल (हिं.स.) दिनांक ७ मे रोजी घड्याळ्याच्या चिन्हावर बटन दाबत सेवा करण्याची संधी द्या. शेवटपर्यंत हा सुनिल तटकरे धर्मनिरपेक्ष विचाराचा राहिल आणि सर्वांना सोबत घेऊन काम करेल असा विश्वास व्यक्त करतानाच माझ्या अल्पसंख्याक समाजाने जी ताकद आणि शक्ती दिली त्यांचा आयुष्यभर मी ऋणी राहिन असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी श्रीवर्धन येथील अल्पसंख्याक मेळाव्यात दिला.

सकाळी म्हसळा येथे मेळावा पार पडल्यानंतर संध्याकाळी श्रीवर्धन येथे अल्पसंख्याक मेळावा पार पडला.

या मतदारसंघाने बॅरिस्टर अंतुले यांच्या रुपाने सर्वोच्च पद या महाराष्ट्राने पाहिले. गतिमान विकास... प्रचंड आत्मविश्वास... जनतेचे अलोट प्रेम... आणि प्रशासनावरील अफलातून पकड... १९६९ ते १९८२ पर्यंत या मतदारसंघाने विकास अनुभवला. दुर्दैवाने कुणाची दृष्ट लागली माहित नाही पण १९९५ ते २००९ पर्यंत धर्म, समाज याची गल्लत करत भावनिक आधार घेऊन राजकारण या परिसरात झाल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

माझ्या नशिबी लिहिले होते की, या मतदारसंघामध्ये मी नेतृत्व करावे. मतदारसंघाची पुनर्रचना झाली. ज्या मतदारसंघाचे नेतृत्व बॅरिस्टर अंतुले, रविंद्र राऊत यांनी केले. त्या मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी मला अल्लातराने मला दिली हे मी माझं भाग्य समजतो असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

मी अंतुलेसाहेबांएवढा मोठा नाही. मी समुद्रातील एक थेंब आहे आणि अंतुलेसाहेब समुद्र तर मी थेंब आहे. तरीसुद्धा तो थेंब म्हणून ज्यावेळी काम करण्याची ४० वर्षांपूर्वी भूमिका घेतली. १९६७ साली मी अंतुले साहेबांना बघितले त्यावेळी माझं वय १२ वर्ष होते. त्याला आज ५७ वर्षे झाली. त्यावेळी ते श्रीवर्धनचे आमदार होते. मला वाटलंही नाही की मला या नेतृत्वाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळेल. आज त्यांच्या बरोबरीने विकासाचा वारसदार म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट मत सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.

इतके काम तटकरेसाहेब आपल्या मतदारसंघात करत आहे तर त्यांना प्रचार करायची गरजच नाही असे सांगतानाच तटकरेसाहेबांना जास्तीत जास्त मतदान करुन केंद्रात पाठवा असे आवाहन बाबा सिद्दीकी यांनी केले.

मी निवडणूकीत सुनिल तटकरे यांच्यासोबत राहणार आहेच शिवाय त्यानंतरही त्यांच्यासोबत राहणार आहे असा शब्द मुश्ताक अंतुले यांनी यावेळी बोलताना दिला.

रायगड जिल्हयात कधीच जातीपातीचे राजकारण झाले नाही. रायगड जिल्हयात सर्वाधिक हिंदू म्हणजे ९५ टक्के आहेत. मुस्लिम संख्या कमी आहे. या जिल्हयाने ५० वर्षे बॅरिस्टर अंतुले यांना मुस्लिम न समजता आपला नेता म्हणून प्रेम केले पण आज काही लोकांकडून जातीचे राजकारण केले जात आहे. तटकरे यांनी कधीच हिंदू मुस्लीम या नजरेने बघितले नाही. या जिल्हयात असे राजकारण होता कामा नये असे आवाहन मुश्ताक अंतुले यांनी केले.

आज मुस्लिम समाजाला तटकरेसाहेबांसोबत राहण्याची गरज आहे नाहीतर अल्ला आपल्याला माफ करणार नाही असे सांगतानाच यावेळी त्यांना मतदान करायला चुकलो तर कर्तव्य करायला चुकलो असे घडून पुढील पाच वर्षे पाठीमागे जाऊ . बॅरिस्टर अंतुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून तटकरेसाहेब काम करत आहेत. निवडणूका येतील - जातील पण आपल्या विकासासाठी तटकरे यांना निवडायला विसरु नका असे आवाहनही मुश्ताक अंतुले यांनी केले.

या मेळाव्यात नजीब मुल्ला, इद्रीस नायकवडी, लतिफ तांबोळी यांनी आपले विचार मांडले.

श्रीवर्धन येथे अल्पसंख्याक सेलचा मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला.

या अल्पसंख्याक मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी, अल्पसंख्याक सेलचे निरीक्षक नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, डॉ. मुश्ताक मुकादम, नजीब असवारे, मनसेचे नेते फैसल फुफेरे आदींसह अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande