मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील हनुमान मंदिरात जाऊन घेतले दर्शन
ठाणे, 23 एप्रिल (हिं.स.) हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील व
मनोभावे


ठाणे, 23 एप्रिल (हिं.स.) हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील वसंतविहार विभागातील जागृत हनुमान मंदिरात जाऊन पवनपुत्र हनुमानाचे भक्तीभावाने दर्शन घेत मनोभावे पूजन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित भक्तगणांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देत प्रसाद म्हणून लाडू वाटप केले.

यावेळी माजी नगरसेवक जेरी डेव्हिड आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका जयश्री डेव्हिड आणि शिवसेनेचे पदाधिकारी तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande