राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी नाशिकचे खेळाडू गोव्याला रवाना
नाशिक, २४ एप्रिल (हिं.स.) : गोवा येथे सहाव्या ऑल इंडिया आंतर शालेय रायन राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच
राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी नाशिकचे खेळाडू गोव्याला रवाना


नाशिक, २४ एप्रिल (हिं.स.) : गोवा येथे सहाव्या ऑल इंडिया आंतर शालेय रायन राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फुटबॉल या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या संकल्पनेतून रायन इंटरनॅशनल शिक्षण संस्थेचे संस्थेचे चेअरमन डॉ ए.एफ. पिंटो यांच्या माध्यमातुन खेळाडूंच्या उत्तरोतर प्रगतीसाठी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आंतरशालेय, विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन केले जात आहे. यावर्षीच्या या ऑल इंडिया रायन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन गोवा येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी सेंट फ्रान्सिस हायस्कूल तिडके कॉलनी आणि सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राणेनगर या शाळेचे सात खेळाडू यांची निवड झाली आहे. यामध्ये आदित्य गरुड, ज्ञानेश राऊत,स्वराज महाजन, ईशान जानगवळी, विकास अनिल राम आणि मनीष कनकुटे यांचा समावेश असून हे खेळाडूं स्पर्धेसाठी गोवा येथे रवाना झाले. यांच्या बरोबर संघ मार्गदर्शक म्हणून दिनेश जॉन यांची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या खेळाडूंना संस्थेच्या संचालक ग्रेस पिंटो मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, पर्यवेक्षिका सिना बिपिन, आयडिया फर्नांडिस, क्रीडा शिक्षक आदींनी करून त्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande