शरद पवारांची राजकीय खेळी, फडणवीसांचे निकटवर्तीय संजय क्षीरसागर लागले गळाला
सोलापूर 24 एप्रिल (हिं.स) उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले ज
शरद पवारांची राजकीय खेळी, फडणवीसांचे निकटवर्तीय संजय क्षीरसागर लागले गळाला


सोलापूर 24 एप्रिल (हिं.स) उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. भाजपत गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली, त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत हा भाजपसाठी धक्का मानला जातोय.

संजय क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: संजय क्षीरसागर यांनी दिली. संजय क्षीरसागर यांनी भाजपकडून मोहोळ विधानसभा देखील लढवली आहे. संजय क्षीरसागर म्हणाले, गेली 25 वर्षे म्हणजे 1998-99 पासून भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. जिल्हापरिषद , विधानसभा, जिल्हा पंचायत अशा अनेक निवडणुका लढवल्या. सामान्य जनतेवर होणाऱ्या अन् अनेक मोर्चे काढले. कठीण काळात भाजपसोबत होतो. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ज्या तालुक्याकील लोकांनी माझी पाठराखण केली. त्यांना मी आजपर्यंत काही देऊ शकलो नाही.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande