माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात
सोलापूर, 25 एप्रिल, ( हिं.स) - माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र असताना हा म
माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात


सोलापूर, 25 एप्रिल, ( हिं.स) - माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र असताना हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी आता भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मैदानात उतरवण्यातं ठरवलं आहे. येत्या 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी हे माळशिरस म्हणजे मोहिते पाटील यांच्या होमग्राऊन्डवर सभा घेणार आहेत.

माळशिरस येथे 1 लाख लोकांची विराट सभा घेतली जाणार असून यासाठी भाजपसह सर्व मित्रपक्ष तयारीला लागले असल्याची माहिती माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. या सभेसाठी पंतप्रधान मोदींसोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक नेते हजेरी लावणार आहेत.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी अकलूज येथे पंतप्रधान मोदी यांची अशीच विशाल सभा घेऊन दाखवली होती. आता मोहिते आणि उत्तम जानकर सोबत नसताना त्यांच्या विरोधात तशीच मोठी सभा घेणे हे भाजपासाठी मोठे आव्हान असणार आहे. भाजपच्या रणजित निंबाळकरांच्या विरोधात मोहिते पाटलांना आधी उत्तम जानकर आणि नंतर फलटणच्या निंबाळकर परिवाराची साथ मिळाल्याने शरद पवारांचं पारडं जड झाल्याचं चित्र आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande