जेईई मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर
नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) बुधवारी रात्री उशिरा जेईई मुख्य परी
संग्रहित


नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) बुधवारी रात्री उशिरा जेईई मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर केलाय. विद्यार्थ्यांना jeemain.nta.ac.in या संकेत स्थळावर जाऊन निकाल पाहता येणार आहे.

एनटीएने जानेवारी आणि एप्रिल सत्रासाठी पेपर 1 बीई आणि बीटेकचा एकत्रित निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 56 उमेदवारांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यात तेलंगणातील 15, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 7 आणि दिल्लीतील 6 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तब्बल 2 लाख 50 हजार 284 मुलांनी आयआयटी प्रवेश परीक्षा जेईई ऍढव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या 29 उमेदवारांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना आता पुढील 3 वर्षांसाठी ही परीक्षा देता येणार नाही. या परीक्षेच्या दुसऱ्या सत्रात 10 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. आसाम, बंगाल, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूमध्ये य भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.

जानेवारीच्या सत्रात 23 उमेदवारांनी 100 टक्के गुण मिळवले होते. तर एप्रिलच्या सत्रात 33 उमेदवारांनी 100 गुण मिळवले आहे. एकत्रित निकालात 100 टक्के मिळालेल्या एकूण 56 उमेदवारांपैकी 40 उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत. तर 10 ओबीसी, 6 जनरल ईडब्ल्यूएस श्रेणीतील आहेत. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील एकही उमेदवाराला 100 टक्के गुण मिळवता आलेले नाहीत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande