पंतप्रधानांच्या दौरा कालावधीत कोल्हापूर शहरात ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी
कोल्हापूर, 25 एप्रिल, (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी कोल्हापूर दौर
पंतप्रधानांच्या दौरा कालावधीत कोल्हापूर शहरात ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी


कोल्हापूर, 25 एप्रिल, (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी कोल्हापूर दौरा असून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून दौ-या दरम्यान मान्यवरांना झेड प्लस सुरक्षा व ए.एस.एल सह वर्गवारी असल्याने संरक्षित व्यक्ति यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोल्हापूर विमानतळ परिसर व संपूर्ण कोल्हापूर शहरात ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ मधील कलम १४४ अन्वये बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील, असेही या आदेशात नमूद आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande