रत्नागिरी : रायपाटण येथे १० मे रोजी रक्तदान शिबिर
रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : रायपाटण (ता. राजापूर) येथील गांगणवाडीतील जागृत सेवा मंडळातर्फे अक्
रत्नागिरी : रायपाटण येथे १० मे रोजी रक्तदान शिबिर


रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : रायपाटण (ता. राजापूर) येथील गांगणवाडीतील जागृत सेवा मंडळातर्फे अक्षय्य तृतीयेच्या उत्सवानिमित्त आरोग्य शिबिरासह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

हे शिबिर १० मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रायपाटण येथील श्रीवडची आई मंदिरात पार पडणार आहे. एसएसपीएम मेडिकल कॉलेज व लाइफटाइम हॉस्पिटल ब्लड सेंटर आणि हेल्थ चेकअप टीम (पडवे, सिंधुदुर्ग) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.शिबिरात रक्तदानासह डोळे तपासणी, शुगर चेकअप, रक्तदाब तपासणी, मोफत गोळ्या औषधे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोफत सल्ला दिला जाणार असून या शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील जनतेने घेण्याचे आवाहन जागृत सेवा मंडळाने केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande