रत्नागिरी : सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम अत्यावश्यक : डॉ. नंदकिशोर पाराशर
रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : अस्थिरुग्ण शिबिरामुळे वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आणि चिपळूण नागरी परिव
रत्नागिरी : सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम अत्यावश्यक : डॉ. नंदकिशोर पाराशर


रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : अस्थिरुग्ण शिबिरामुळे वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आणि चिपळूण नागरी परिवाराचे आम्ही सदस्य बनलो आहोत. सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. तरच तुम्ही निरोगी राहू शकता, असा सल्ला डॉ. नंदकिशोर पाराशर यांनी दिला.चिपळूण येथील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने आयोजित केलेल्या अस्थिरुग्ण तपासणी उपचार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनीही शिबिराचे कौतुक केले.

हा कार्यक्रम चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनमध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाला. शिबिरात १२०० अस्थिरुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली.या प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव यांनी सांगितले की, या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करता आली. या सगळ्यांच्या आयुष्यातील दुःख थोडेफार हलके करण्याचा काम हातून झाले. ही सेवा ईश्वरी कार्य असल्याचे आपण मानतो. ते पुढे म्हणाले, डॉ. पाराशर व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या ऋणानुबंधातून ही सेवा घडत आहे, याचे समाधान आहे. डॉ. पाराशर यांनी अस्थिरुग्णांची केलेली तपासणी व उपचारातून रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहिल्यानंतर खऱ्या अथनि समाजासाठी काय करायला हवे ते उलगडून आले. सेवा समर्पित असल्याशिवाय कृती होत नाही. ते काम वाशिष्ठी डेअरी आणि चिपळूण नागरी पतसंस्थेच्या परिवाराने सिद्ध करून दाखवले आहे. ही सारी किमया चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यामुळे घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. हेमंतकुमार पाराशर, डॉ. निखिल पाराशर, डॉ. राकेश पाराशर यांचा वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आणि चिपळूण नागरी परिवारातर्फे सन्मान करण्यात आला. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका स्मिता चव्हाण, व्हाइस चेअरमन अशोक साबळे, संचालक अशोक कदम, डेअरी प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande