अहमदनगर : रॅगिंग करणे गुन्हा- प्रा. खरात
अहमदनगर, 27 एप्रिल (हिं.स.):- विद्यार्थी जीवनात ज्ञान प्राप्ती हेच महत्वाचे कर्तव्य असून इतर आवांतर
रॅगिंग करून छळ करणे हा गुन्हा आहे


अहमदनगर, 27 एप्रिल (हिं.स.):- विद्यार्थी जीवनात ज्ञान प्राप्ती हेच महत्वाचे कर्तव्य असून इतर आवांतर विषयाकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करावे.रॅगिंग करून छळ करणे हा गुन्हा असल्याचे प्रतिपादन आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात यांनी केले आहे. एसएमबीटी दंत महाविद्यालय येथे अँटी रॅगिंग या महत्त्वपूर्ण विषयाबद्दल कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक पाटील हे होते.व्यासपीठा वर उपप्राचार्य डॉ.गिरीश नाझीरकर, प्रशासकीय अधिकारी डॉ.सुयोग तूपसाखरे,अँटी रॅगिंग कमिटी सदस्य,पत्रकार गौतम गायकवाड,ऍड.प्रज्ञा लामखडे,पालक प्रतिनिधी डॉ.माहेश्वरी ओझा,डॉ.मंडलिक सुभाष,बाबासाहेब ढगे,प्रा. पंकज जाधव,रमेश दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रा.बाबा खरात म्हणाले की,रॅगिंग करणे ही एक मनोविकृती आहे.आपली भारतीय संस्कृती ही माणसाला जगा आणि जगू द्या अशी आहे.जेव्हा व्यक्ती ही संस्कृतीकडून विकृतीकडे जाते तेव्हा कायद्याची गरज भासते.समाजातील व्यक्तींना योग्य मार्गदर्शन असेल तर समाजात शांतता राहते व त्यांचे आयुष्य सुखकर होते.माणूस हा समाजशील प्राणी असला तरी प्रकृतीला संस्कृतीचे रूप देऊन माणसाने आपली वेगळेपण सिद्ध केले आहे.महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्या र्थ्यांनी शिक्षणाचा आनंद घ्यावा.रॅगिंग सारख्या कृतीत भाग न घेता करिअरच्या दृष्टीने उपयुक्त उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी प्राचार्य डॉ.पाटील म्हणाले की,अँटी रॅगिंग कमिटीच्या माध्यमातून प्रबोधन,जागृती केली जाते.विद्यार्थ्यांकडून विकृत स्वरूपाच्या घटना घडू नयेत यासाठी समुपदेशन कार्यक्रम घेतले जातात. एसएमबीटी महाविद्यालयाचा ही हाच हेतू असून अँटी रॅगिंग कमिटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल.यावेळी पत्रकार गौतम गायकवाड डॉ.माहेश्वरी ओझा,डॉ.सुभाष मंडलिक यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande