केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चित्तरंजन धंगडा माझी भिवंडी लोकसभा मतदारसंघात दाखल
ठाणे, 27 एप्रिल (हिं.स.) : २३- भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी चित्तरंजन धंगडा माझी (IRS) यांची केंद्रीय
केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चित्तरंजन धंगडा माझी भिवंडी लोकसभा मतदारसंघात दाखल


ठाणे, 27 एप्रिल (हिं.स.) : २३- भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी चित्तरंजन धंगडा माझी (IRS) यांची केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने त्यांची केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. चित्तरंजन धंगडा माझी हे भारतीय महसूल सेवेतील २०१० च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभासंघाकरिता कामकाज सोपविण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ

२३ -भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक चित्तरंजन धंगडा माझी यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, उप विभागीय कार्यालय, भिवंडी येथे भेटण्याची वेळ दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्यांचा मतदारसंघातील संपर्क क्रमांक ८३६९७३६०८२ असा असून [email protected] हा त्यांचा ई-मेल आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande