निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चंद्र प्रकाश मीना व राहील गुप्ता ठाणे लोकसभा मतदारसंघात दाखल
ठाणे, 27 एप्रिल, (हिं.स.) - २५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) व राहिल गुप्ता (
निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चंद्र प्रकाश मीना व राहील गुप्ता ठाणे लोकसभा मतदारसंघात दाखल


ठाणे, 27 एप्रिल, (हिं.स.) - २५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) व राहिल गुप्ता (आयआरएस) यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने या दोघांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. चंद्र प्रकाश मीना व राहील गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. चंद्र प्रकाश मीना हे भारतीय महसूल सेवेतील (IRS) २०१० च्या बॅचचे अधिकारी आहेत. मीना हे २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील १४८ - ठाणे, १५० - ऐरोली, १५१ बेलापूर या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील.

गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील (IRS) २०१२ च्या बॅचचे अधिकारी असून ते २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील १४५ मिरा-भाईंदर, १४६ ओवळा-माजिवडा, १४७ कोपरी-माजिवडा या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील.

वरील दोन्ही निरीक्षक हे आज २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत.

खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांना शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. उपरोक्त अधिकाऱ्यांचे मतदार संघातील संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक चंद्र प्रकाश मीना यांचा संपर्क क्रमांक ८३६९०४५८२४ असा असून ईमेल आयडी Expobserver२५[email protected] असा आहे. तर, गुप्ता यांचा संपर्क क्रमांक ८७७९०२६९१४ असा असून Exp.observer.pc२५@gmail.com हा त्यांचा ईमेल पत्ता आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande