नेपाळ, २४ जुलै (हिं.स.) : नेपाळमध्ये काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेकऑफदरम्यान सौर्य एअरलाइन्सच्या विमानाचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला.
हे विमान पोखरा शहराकडे जात होते आणि सकाळी 11 वाजता उड्डाण करत असताना धावपट्टीवरून घसरले. विमानाला आग लागल्यामुळे अपघात झाला.घटनेची माहिती मिळताच मदतकार्य पथके घटनास्थळी पोहोचली. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानात कर्मचाऱ्यांसह १९ जण होते. विमानतळावरील सुरक्षेच्या उपाययोजनांनंतरही ही दुर्घटना घडली. पायलट गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातामुळे नेपाळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेच्या उपाययोजना आणि तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.नेपाळच्या हवाई वाहतूक विभागाने अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे. विमानतळावरील इतर उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे नेपाळमधील हवाई सुरक्षेच्या स्थितीवर विचारमंथन सुरू झाले आहे.
हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao / मनीष कुलकर्णी