नोबेल शांतता पुरस्कारासाठी आता मेलानिया ट्रम्प यांना नामांकन?
वॉशिंग्टन, 31 ऑगस्ट (हिं.स.)।जगात मागच्या काही दिवसापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र आता या पुरस्कारासाठी आता अमेरिकेच्या फस्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या देख
मेलानिया ट्रम्प


वॉशिंग्टन, 31 ऑगस्ट (हिं.स.)।जगात मागच्या काही दिवसापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र आता या पुरस्कारासाठी आता अमेरिकेच्या फस्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

फ्लोरिडा रिपब्लिकन प्रतिनिधी ऍना लिना लुना यांनी,”युक्रेन युद्धाशी संबंधित शांतता प्रयत्नांमध्ये त्यांच्या भूमिकेसाठी अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांना २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले जाऊ शकते.” असा मोठा दावा केला आहे.

लुना यांनी एका मुलाखतीत बोलताना हा दावा केला कि, रशिया आणि युक्रेनमधील संभाव्य शांतता प्रगतीमागे मेलानिया ही एक प्रमुख कारण असू शकते. लुना यांनी,”मेलानिया ट्रम्प यांनी रशियासोबतच्या अमेरिकेच्या संवादात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. युक्रेन संघर्षाशी संबंधित अमेरिकेच्या मध्यस्थी प्रयत्नांमध्ये मेलानिया आणखी सहभागी होऊ शकतात असे त्यांनी संकेतही दिले.”असे म्हटले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला अलास्कामध्ये युक्रेन युद्धावर केंद्रित झालेल्या शिखर परिषदेदरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानिया यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना लिहिलेले पत्र सुपूर्द केले. मेलानियाच्या कार्यालयाने नंतर हे पत्र माध्यमांना प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी युद्धामुळे प्रभावित झालेल्या मुलांचे संरक्षण करण्याचे पुतिन यांना आवाहन केले.

मात्र, हा संदेश मुख्यत्वे मुलांच्या कल्याणावर केंद्रित होता. परंतु वृत्तसंस्थांनी अप्रत्यक्षपणे हजारो युक्रेनियन मुलांचा उल्लेख केला आहे ज्यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाला नेण्यात आल्याचे वृत्त आहे. अलास्का शिखर परिषदेत ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील चर्चेला कोणतेही मोठे यश मिळाले नाही. रशियन सैन्याने युक्रेनियन शहरांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी कीवमध्ये रशियन गोळीबारात २३ लोक मारले गेले, ज्यात चार मुले आहेत.

दरम्यान, अनेक देशांनी नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकित केले आहे, ज्यात रवांडा, इस्रायल, गॅबॉन, अझरबैजान आणि कंबोडिया यांचा समावेश आहे. याशिवाय, काही व्यक्तींनी ट्रम्प यांना खाजगीरित्या देखील नामांकित केले आहे. अधिकृत नियमांनुसार, हा पुरस्कार तीन व्यक्ती किंवा संघटनांमध्ये वाटला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, नोबेल समिती १० ऑक्टोबर २०२५ रोजी नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची घोषणा करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande