अकोल्यातील पोलीस कर्मचारी अडकला एसीबीच्या जाळ्यात
अकोला, 25 जुलै, (हिं.स.) - काही दिवसांपूर्वी अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर नागपूरात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुन्हा याच पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल
Photo


अकोला, 25 जुलै, (हिं.स.) - काही दिवसांपूर्वी अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर नागपूरात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुन्हा याच पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. आज (ता. 25) रोजी एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली आहे. गणेश डुकरे असं आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर नागपुरात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. युपीएससीचा अभ्यास करीत असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीची छेडखानी केल्याचा ठपका पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणामुळे अकोला पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच या प्रकाराने अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली होती. आता पुन्हा एकदा एका दुसऱ्या प्रकारामुळे खदान पोलीस ठाणे चर्चेत आलं आहे. एक पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. खदान पोलिस ठाणे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अगदी समोर आहे. तरीसुद्धा या ना त्या कारणाने हे ठाणे चर्चेत राहते.

नेमकी घटना काय!

अकोल्यातील खदान पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. गणेश डुकरे असं कारवाई करण्यात आलेल्या लाचखोर पोलिसाचं नाव आहे. यातील तक्रारदार यांचे भंगाराचे दुकान आहे. आरोपी पोलिसाने त्याला तुम्ही चोरीची भांडी खरेदी केलेली आहेत असे बोलुन त्यामुळे तुमच्याविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करावी लागेल. जर गुन्हा दाखल होवू द्यायचा नसेल व अटक करायची नसेल तर एक लाख रुपये द्या असे म्हणुन लाचेची मागणी केली आहे. परंतु तकारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पोलीस कर्मचारी गणेश डुकरे याचे विरूध्द कारवाई होणे करीता एसीबी अकोलाच्या कार्यालयात तकार दिली होती. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस कॉन्स्टेबल गणेश डुकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यास पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळून ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई अकोला एसीबीचे पोलिस उप अधीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. सदरची कारवाई नरेंद्र खैरनार व त्यांच्या पथकातील संदीप ताले, प्रदीप गावंडे यांनी केली.

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे / हर्षदा गावकर


 rajesh pande