बीडमध्ये वेश्‍या व्यवसायावर छापा, पीडित महिलेची सुटका करून तिघांना अटक
बीड, 1 जून (हिं.स.)। बीड येथील उच्चभ्रू वस्तीत सुरु असलेल्या वेश्‍या व्यवसायाचा अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला.जालना रोडवरील बॅंक कॉलनीत छापा टाकून या पथकाने परराज्यातील पिडीत महिलेची सुटका करून तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या
वेश्‍या व्यवसायावर छापा


बीड, 1 जून (हिं.स.)। बीड येथील उच्चभ्रू वस्तीत सुरु असलेल्या वेश्‍या व्यवसायाचा अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला.जालना रोडवरील बॅंक कॉलनीत छापा टाकून या पथकाने परराज्यातील पिडीत महिलेची सुटका करून तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतला सुरेश राऊत (४०), महेश मोहनराव चांदणे (३३) व मुमताज नासिर शेख या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.जालना रोडवरील इंडिया बॅंक कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरु असल्याची माहिती, अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्होगाडे यांना मिळाली. यांनतर त्यांनी पथकासह छापा टाकला आणि एका महिलेच्या माध्यमातून परराज्यातील महिलेकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले.पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद (कोलकाता) येथील पिडीतेची कारवाईत सुटका करण्यात आली.

शकुंतला राऊत हिच्या भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता. मुमताज शेख महिलांची व्यवस्था करत असे, तर दलाल महेश चांदणे त्याच्या रिक्षातून महिलांची ने-आण करीत असे, असं कारवाईत समोर आल आहे.पोलिसांनी शकुंतला राऊत व महेश चांदणे यांना अटक केली. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात पूर्वीही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत कारवाया झालेल्या आहेत. कारवाईत वर्षा व्हगाडे, संजय सुरवसे, अशोक शिंदे, प्रदीप येवले, अनिता माने, मनीषा खरमाटे यांचा सहभाग हेाता.पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये आणखी काय काय उघड होतय अशा दिशेने तपास सुरु केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande