सोलापूर, 1 जून (हिं.स.)।
वडिलांचे वर्षश्राद्ध असल्याने विजयालक्ष्मी बोगा (रा. जोडभावी पेठ) या भाऊ दशरथ कुडक्याल याच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी दिर नागनाथ भुमय्या बोगा याच्यासह पाच जणांनी काहीतरी कारण सांगून जनता बॅंकेत खाते उघडले. त्यानंतर मृत पतीचे पैसे मिळणार असल्याचे सांगून रजिस्टार कार्यालयात नेऊन स्वाक्षरी घेऊन हिश्याची जागा बळकावली, अशी फिर्याद विजयालक्ष्मी बोगा यांनी सदर बझार पोलिसांत दिली आहे.
फिर्यादी विजयालक्ष्मी बोगा यांच्या पतीचे निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या वर्षश्राद्धासाठी १८ मार्च २०२४ रोजी विजयालक्ष्मी या भावाकडे माहेरी आल्या होत्या. त्यावेळी दीर नागनाथ बोगा, त्याची पत्नी पुष्पावती बोगा, पुतण्या भुपेश बोगा, भाचा प्रशांत व नातेवाईक राजेश चिप्पा या पाच जणांनी काहीतरी काम असल्याचे सांगून पाच्छा पेठेतील जनता बॅंकेत नेले. अर्जावर अंगठे घेऊन बॅंक खाते उघडले.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड